अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयात भरला विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार.
इंदापूर: निर निमगाव (ता. इंदापूर) येथील अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व आठवडा बाजाराचे दि. ५ व ६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय घोगरे, विश्वस्त सौ शोभाताई घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव अजित, घोगरे, नीर निमगाव सोसायटीचे चेअरमन अण्णा पवार, मोहन जाधव, हनुमंत गरगडे, आरोग्य खात्याच्या डॉ.सौ.सस्ते मॅडम, दिपक जाधव ,प्रताप देवडे, मकर सर, भिमराव गरगडे, दिपक गरगडे, अंकूश सावळकर, अजित गरगडे, श्रावण घोडके, युवराज निकम ,अच्युत जाधव, रविंद्र जाधव, संदिप शेंडगे, विष्णूपंत सावळकर, मारुती गरगडे,मुख्याध्यापक छगन पिसे ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये मैदानी खेळ खो- खो, कबड्डी, धावणे इत्यादी खेळातून विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढावी तसेच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे या हेतूने चलनाचे मूल्य , नफा तोटा कळवा या हेतूने विद्यार्थ्यांचा आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले . या आठवडा बाजारात २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .त्यामध्ये तीस हजार रुपयाची उलाढाल झाली. बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, वेगवेगळ्या मिठाई, चहा, किराणा, यासह देशी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन बसले होते .

