श्री पळसनाथ विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
इंदापूर : पळसदेव दि.15  श्री. पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पळसनाथ माध्य व उच्च माध्य विद्यालयामध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .
 यामध्ये प्रभात पेरी काढून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली तसेच कवायत प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशाविषयी असणारे आपले विचार व्यक्त केले.
 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राचार्य विकास पाठक यांनी शाळेचा प्री प्रायमरी ते बारावी पर्यंतच्या विकासाचा थोडक्यात आढावा सांगितला विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशाविषयी असणारे आपले विचार व्यक्त केले .
संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी गुणवंत विद्यार्थी नॅशनल कुस्तीपटू कु. अहिल्या शिंदे, सायकलिंग पटू हरीश डोंबाळे व लोकसेवा आयोगाच्या विविध खात्याअंतर्गत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .स्पर्धा परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले विद्यालयातील दहावी बारावी मध्ये प्रथम द्वितीय क्रमांक आलेले विद्यार्थी व खेळाडूंना रोख रक्कम ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित आले.
 सरपंच अंकुश जाधव यांनीही शाळा व विद्यार्थ्यांसाठी सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पळसदेव गावचे सरपंच अंकुश जाधव होते व ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी केले. संस्थेचे सचिव योगीराज काळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
 मुख्याध्यापक विकास पाठक , पर्यवेक्षक संजय जाधव सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पंचक्रोशीतील पालक आदी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी तर आभार अविनाश शेलार यांनी मानले.