shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*

*भिमाई आश्रमशाळेत  ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*
*इंदापूर*(*दि.१५*) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्य. आश्रमशाळा व मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सकाळी ठीक ८:०५ वा. साजरा करण्यात आला.
 यावेळी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त हवालदार मधुकर जगताप (पुणे)  यांच्यासह मान्यवरांनी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेेस पुष्पहार,संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजपूजन तर भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त हवालदार मधुकर जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
 यावेळी कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा आयु.शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे , संचालक राहुल सवणे, गोरख तिकोटे, संजय कांबळे, डॉ.अनार्या मखरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन, अविनाश कोथमिरे, माऊली नाचण, इम्रान शेख. सचिन बेसरे.तसेच मुख्याध्यापक, प्राचार्या, शिक्षक,प्राध्यापक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले.
close