shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* .

*एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* . 
इंदापूर: पळसदेव ता. इंदापूर येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यामध्ये प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली तसेच कवायत  व डंबेल्स प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले . नृत्य सादरीकरण तसेच वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषा प्री प्रायमरी मधील विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या तसेच त्यांचे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले गेले . विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशाविषयी असणारे आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राचार्य वंदना बनसुडे यांनी मुलांना संबोधित केले. यावेळी डी टी एस इ परीक्षेचे दीपक चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोबाईल मर्यादित वापरण्याचा मौलिक सल्ला दिला यावेळी इयत्ता दहावी व बारावी इयत्तेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण तसेच डी टी एस इ परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याला ३०००, द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याला २०००हजार व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याला १०००रुपये प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले  व बाळासाहेब गांधले यांनी प्री प्रायमरी ते बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दोनशे रुपये याप्रमाणे  एकत्रित आठ हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले  . प्रकाश रासकर यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षकांचे व संस्थेचे कौतुक केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत नाना बनसुडे उपाध्यक्ष शीतलकुमार शहा कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे , हनुमंत मोरे ,अंकुश बनसुडे, अनुराधा कणके, अर्चना बनसुडे ,बाबा  बनसुडे ,विठ्ठल बनसुडे,किरण काळे, छगन बनसुडे ,सचिव नितीन बनसुडे, मीनाक्षी आगवणे, आर.सी इनामदार , किशोर जगताप,मुख्याध्यापक राहुल वायसे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पंचक्रोशीतील पालक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे व सुवर्णा वाघमोडे यांनी तर आभार सुजाता ढवळे यांनी मानले.
close