shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषणाचा तिसरा दिवस,प्रशासनाकडुन अद्याप दखल नाही....

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील गट क्र.९४४ मधील गौण खनिज घोटाळा,वाढोणा येथील पोदार इंग्लिश शाळेने अतिक्रमण केलेली गायरान जमिन तात्काळ मोकळी करण्यात यावी यासह विविध मागण्या संदर्भात नगरसेवक तथा माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख व पत्रकार जगन्नाथ पुरी यांनी दि.५ जुलै शनिवार पासुन सेनगांव तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असुन आज दि.७ जुलै सोमवार रोजी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण कर्त्यांची तब्बेत खालावली मात्र जिल्हा प्रशासनाचा कोणता ही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नाही.


सेनगांव येथील गट क्र.९४४ मधील प्लाँटींग मध्ये महसुल व प्लाँटींग मालकाने तालुका प्रशासनाच्या मुख सहमतीने व सलोख्याने लाखो रुपयाचा गौण खनिजाचा नियमबाह्य भरणा केला असुन शासनाचा लाखो महसुल बुडविण्यात आला आहे.सदर गट क्र.हा ३ हेक्टर २० आर आहे.तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी सेनगांव परीसरात गौण खनिज साठा उपलब्ध नाही असे पत्र देऊन ही तालुका प्रशासनाने बेसुमार अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्याला अभय का दिले? गट नं.९४४ चा एन.ए.लेआऊट सह विविध तक्रारीची चौकशी करणे,वाढोणा येथील पोदार इंग्लिश शाळेने अतिक्रमण केलेली गायरान जमिन तात्काळ मोकळी करण्यात यावी,नायब तहसिलदार अनिल सरोदे प्रभारी तहसिलदार म्हणुन कार्यरत असलेल्या कालावधी दरम्यान अधिकाराचा दुरुपयोग करुन जमिन वाटणी प्रकरणाची चौकशी करणे,शासकीय स्वस्त धान्य गोदामपाल दिलीप कदम यांच्या कारभाराची चौकशी करणे,सन २०२० ते २०२२-२०२३ दरम्यान सेनगांव तहसिल अंतर्गत झालेल्या कोतवाल भरतीची चौकशी करणे,सेनगांव शहराजवळील कयादु नदीवरील पुलाची उंची कमी करुन थातुर मातुर केलेल्या कामाची चौकशी करणे,मागच्या दोन वर्षात शेतकऱ्यांची उर्वरित राहीलेला पिकविमा तात्काळ देण्यात यावा,सेनगांव शहर ते तोष्णीवाल काँलेज या रस्त्यावरील धनगर वढ्यावरील पुलाची उंची वाढविल्याने शेतकऱ्यांना शेतातुन शेतीमाल वाहतुक करणे मुश्कील झाले आहे त्याची चौकशी करणे आदी वरील मागण्याची चौकशी तात्काळ करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी या मागणी संदर्भात नगरसेवक ओमप्रकाश देशमुख व जगन्नाथ पुरी हे उपोषणास बसले आहेत.


सेनगांव तालुक्यातील विविध विकास कामात व शासकीय योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषीवर योग्य कारवाई करण्या संदर्भात वारंवार जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते परंतु चौकशी करुन कारवाई झाली नाही‌.लोकप्रतिनिधींच्या तक्रारीचे गांभिर्य लक्षात न घेतल्यामुळे नाईलाजाने दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी मा.विभागीय आयुक्त साहेब,विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण केले असता,चौकशी करुन कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यामुळे उपोषण मागे घेतले होते.परंतु मांगण्यासंदर्भात अजुन कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे दि.५ जुलै शनिवार पासुन मी सेनगांव तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसलो असुन आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत.

ओमप्रकाश देशमुख
नगरसेवक तथा माजी जि.प.सदस्य हिंगोली
close