shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा.सपाटे सरांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा:

-

रमेशराव आडसकर, डॉ.अशोक थोरात, हारुनभाई इनामदार, अंकुश अण्णा इंगळे,सीता ताई बनसोड यांची प्रमुख उपस्थिती

*प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी*:-
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित, वसंत महाविद्यालय केज येथे प्रा.गोपीचंदजी सपाटे सर यांनी तब्बल तीस वर्षे विद्यार्थी घडवण्याची सेवा केली आहे.शासकीय नियमानुसार ते आज वयाच्या आठ्ठावणव्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा विठाई मंगल कार्यालय केज येथे शनिवार रोजी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबासहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन रमेशराव आडसकर हे होते.


यावेळी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोकरावजी थोरात साहेब,उपजिल्हाधिकारी निलंगा सन्माननिय‌‌ शरदजी झाडके साहेब ,केज बाजार समिती चे सभापती सन्माननिय‌ अंकुशरावजी इंगळे साहेब,केज नगर पंचायत च्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम,केज नगर पंचायत चे गटनेते सन्माननिय.हारूणभाई इनामदार साहेब,केज तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननिय.बेडसकर साहेब, सन्माननिय.डायट काॅलेजचे प्रा. साईगुंडे ,तुपसागर साहेब, गदळे सर,ऍड.सुभाष शिंदे साहेब, प्राचार्य प्रकाश धेंडे,डॉ.काळे साहेब, इनामदार सर, जगताप सर,कवडे सर,स्वामी सर इ.प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
 

यावेळी वसंत ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थीनीं कु.गायकवाड सायली,कु.कापरे जान्हवी, यांनी मनोगत व्यक्त केले.सरांनी वर्गात विद्यार्थ्यांना  शिस्तीचे धडे दीले तसेच कठीण इंग्रजी  विषय सोप्या पध्दतीने शिकवतात.विद्यार्थी चुकला तर रागावतात पण माया देखील खुप लावतात.आसे मनोगतात सांगितले.सन्माननिय.डाॅ.थोरात साहेब,झाडके साहेब, जगताप सर, कवडे सर,साईगुंडे सर,हारूणभाई इनामदार,सीताताई बनसोडे मॅडम,यांनी प्रा.सपाटे सरांच्या उत्कृष्ट कार्याची सविस्तर भाषणात मांडणी केली.

डाॅ.थोरात साहेब यांनी सपाटे सरांचा आत्मविश्वास,धाडस,संकटवर मात करण्यासाठी लागणारी जीद्द , इच्छा शक्ती या सर्व पैलूंचा भाषणात आलेख मांडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशरावजी आडसकर साहेब यांनी प्रा.सपाटे सरांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.सरांच्या सेवानिवृत्त मुळे वसंत ज्युनिअर कॉलेज ला त्यांची उणीव होणार आहे,ही खंत व्यक्त केली. सत्कारमूर्ती सन्माननिय.प्रा.सपाटे सरांनी त्यांच्या भाषणात 1990 ते2025 पर्यंत जीवनप्रवास सांगीतला‌.शिक्षकाच्या अंगी निर्व्यसनीपणा,चारीत्र्यसंपन्नता, प्रामाणिकपणा, शिस्त आणी विद्यार्थ्यांन प्रती आस्था,प्रेम,जिव्हाळा हे गुण असणे आवश्यक आहे.हे त्यांनी सांगितले.या वेळी सरांनी आदरणीय.कै.माजी आमदार तात्यांनी नौकरी ची संधी दिली संस्थेचे ऋण व्यक्त केले.आडसकर परीवाराच्या कायम ऋणात राहाण्याचा शब्द त्यांनी दिला.सन्माननिय.रमेशरावजी आडसकर साहेब यांनी कधीपण बोलावले की तात्काळ हजर राहण्याचा संकल्प भाषणात सांगीतला.पुढे देखील प्रा.सपाटे सर सन्माननिय.रमेशरावजी आडसकर साहेब यांचे निष्ठावंत मावळे म्हणूनच काम करत राहाणार आहेत.प्रा.सपाटे सरांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

कार्यकृमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रतीक गायकवाड भाटशिरपूरा ता.कळंब यांनी केले.तर आभार सौ.अमृता अशोक धस यांनी मानले.सदरील कार्यक्रम खुपच भव्य दिव्य पार पाडला गेला. नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close