shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आषाढी एकादशी निमित्त दत्ता धस पंत यांच्या कडून स्तुत्य उपक्रम..!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-                                      

आषाढी एकादशी निमित्त सामाजिक कार्यकर्ते दत्ता धस पंत यांच्या कडून पंढरपूरला जाणे शक्य नाही अशा भाविक भक्तांसाठी हभप केशव महाराज घुले शास्त्री यांच्या आश्रमाच्या निसर्गरम्य वातावरणात आलेला सर्व श्रोते व भावीक भक्तांसाठी फराळाची सुंदर अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. अन्नदान हे श्रेष्ठदान दत्ता धस पंत यांच्या कडून सर्व भाविक भक्तांसाठी करण्यात येणार आहे.दत्ता धस पंत यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.             


                         


रविवार दिनांक 06 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने भगवान श्रीकृष्ण आश्रम केज येथे सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये श्री ह भ प विद्वत् रत्न केशव महाराज घुले शास्त्री यांच्या समुधूर वाणीतून सर्व भाविक भक्तांना मंत्रमुक्त करणारे चिंतनीय कीर्तन होणार आहे .ज्यांना गर्दीमुळे किंवा काही आर्थिक अडचणीमुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा कीर्तन व फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.भावीक भक्तांनी ,श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान भगवान श्रीकृष्ण आश्रम केज व सामाजिक कार्यकर्ते दत्ता धस पंत यांनी केले आहे.

close