प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज नगर पंचायत ही सुंदर व स्वच्छ करू, विकासाची गंगा केज शहरात आणू असे आश्वासन देऊन नगरपंचायत ताब्यात घेणार गेली काही महिन्यांपासून गायब आहेत .केज शहरातील स्वच्छता करण्यास लाखो रुपये खर्च दाखवून पैसे उचलण्याचे काम सुरू आहे .
प्रत्यक्षात मात्र रस्ते झाडलेले सुध्दा नसतात ,सफाई कामगार हे रोज सकाळी झाडू हातात घेऊन इकडून तिकडे फिरण्याचे काम करत असतात .मेन रोड, मंगळवार पेठ,सहित इतर प्रमुख रस्ते धुळीने माखलेले आहेत ,नळाचे पाणी सुटल्यानंतर नालित न जाता रोडवर असते त्यामुळे रस्त्यावर चालणारे लोक परेशान आहेत .व्यापाऱ्यांच्या दारात रोज पाण्याचा डोह सासलेला असतो त्यामुळे नागरिक व व्यापारी त्रस्त आहेत . कानडी रोड चे तर पार बेहाल झाले आहेत , शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांना तर रस्ता नाली या मुलभूत सुविधा पासून वंचित ठेवले आहे, रस्त्यावर घाण व पाण्याची डबकी, खोल खोल खड्डे पडले आहेत,पण केज नगरपंचायतीचे नगरसेवक, नगराध्यक्ष, गटनेते मात्र निधीच्या वाटण्या करून बोगस बिले उचलण्याच्या नादात गुंग आहेत .
नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी ,अधिकारी यांचे तर याकडे लक्षच नाही त्यांचे केज शहरातील शहरातील स्वच्छता व इतर सार्वजनिक कामाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. या सर्व अडचणीमुळे केज शहरातील नागरिक त्रस्त असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत , तरी केज नगरपंचायतीने सार्वजनिक कामे व स्वच्छते याकडे तात्काळ लक्ष द्यावे ही केज शहरातील नागरिकांची प्रमुख मागणी आहे.