श
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयाची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी इ.१२ पर्यंत सक्तीची करावी आणि मराठी संवर्धन व तिचे जतन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयाच्या राज्य कार्यकारिणीची काल राज्य कार्यकारणीच्या आभासी बैठकीमध्ये सचिव बाळासाहेब माने यांनी २०२४ ते २०२७ या तीन वर्षासाठीची कार्यकारणी जाहीर केली.
या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बारामती येथील प्रा. सुनिल डिसले यांची निवड झाली आहे. सचिवपदी प्रा. बाळासाहेब माने, मुंबई, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मनीषा रिठे, वर्धा, उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रतिमा बिस्वास, मुंबई, प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, चंद्रपूर, खजिनदारपदी प्रा. दिलीप जाधव, सांगली, प्रा. संजय लेनगुरे, भंडारा, समन्वयकपदी प्रा. डॉ. पांडुरंग कंद, पुणे, प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे, जालना, सचिवपदी प्रा. डॉ. स्मिता भुसे, अहमदनगर, प्रा. बापू खाडे, पुणे, तर सल्लागारपदी प्रा. संपतराव गरजे, पुणे, प्रा. डॉ. विजय हेलवटे, चंद्रपूर, प्रा. संजय पाटील, रायगड, प्रा. नीता खोत, नागपूर, प्रा. डॉ. अंजना खताळ, मुंबई तसेच ३५ जिल्ह्यांसाठी नव्याने जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारणीच्या माध्यमातून मराठी विषयाच्या अनुषंगाने मराठी भाषाविषयक विविध उपक्रम, विषयातील अडचणींची सोडवणूक, मराठी भाषा विषय शिक्षकांचे प्रश्न, मराठी सक्तीची होण्यासाठीचे प्रयत्न आणि मराठीचे संवर्धन याविषयी कार्य केले जाणार आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

