श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे भास्करराव गलांडे पाटील विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय अध्ययना अध्यात्मिक,शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील ज्ञान अवगत व्हावे यासाठी समुपदेशन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सखी सावित्री महिला माता पालक मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी समुपदेशक सौ. अनिताताई चेडे यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा माजी सरपंच सौ. वनिताताई राऊत, प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या समुपदेशक सौ. अनिताताई चेडे, प्राचार्य डॉ. सुनीताताई गायकवाड,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्यक श्रीमती बोरसे व त्यांचे सर्व कर्मचारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवराम वडीतके, पर्यवेक्षक दिलीप बनकर , माता पालक विभाग प्रमुख श्रीमती सोनवणे, सुनीता, यादव मॅडम, श्रीमती माकोने मॅडम, ज्येष्ठ शिक्षक सराटे सर , श्रीमती लष्कर मॅडम , श्रीमती पुंडे मॅडम, व विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

