shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र केसरी कास्यपदक विजेती कु.ज्योती यादवचा शाळेत सत्कार.

जळगाव: महात्मा फुले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कु. ज्योती यादव हिने महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक पटकावले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे जळगाव जिल्ह्यासह गावाचे, तालुक्याचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.

महाराष्ट्र केसरी कास्यपदक विजेती कु.ज्योती यादवचा शाळेत सत्कार.

तिच्या या विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णासो विजय महाजन, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने तिचा यथोचित सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने तिला भेट स्वरूपात बक्षीस देण्यात आले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासो विजय महाजन आणि शिक्षकांनी कु. ज्योती यादव हिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभाला मुकेश यादव, समाधान महाजन, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

close