सेनगाव/विश्वनाथ देशमुख
सेनगांव येथील ज्येष्ठ पत्रकार शिरीषकुमार तोष्णीवाल यांच्या आई शकुंतलाबाई श्यामसुंदर तोष्णीवाल यांचे दीर्घ आजाराने दि.२६ फेब्रूवारी बुधवार रोजी महाशिवरात्री दिनी वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले.
सेनगाव येथील कयाधुतीरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.येथील ज्येष्ठ पत्रकार शिरिषकुमार तोष्णीवाल व व्यापारी शैलेश तोष्णीवाल यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्या अत्यंत मायाळू व मनमिलावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने सेनगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


