shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा..!

सेनगांव/विश्वनाथ देशमुख:

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.२८ फेब्रुवार रोजी सी.व्ही.रमण यांच्या संशोधनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.




    याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी.तळणीकर हे तर डॉ. पी. बी.पाटील,डॉ.एस. एस.अग्रवाल, डॉ.यू.एल.साहू,डॉ.आर. ए.जोशी, डॉ.वाय. एस. नलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. साहू यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२५ ची थीम तसेच सदरील थीमचा उद्देश विस्तृत स्वरूपात विशद केला. डॉ. व्ही.बी. कल्याणकर यांनी विज्ञानाच्या संशोधनासोबतच इकोसिस्टीमचा देखील विचार व्हावा असे मत व्यक्त केले. डॉ.आर. ए.जोशी यांनी आंतरविद्याशाखीय संशोधन आणि सामाजिक विकास याची सांगड घातली गेली पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. तळणीकर यांनी समाजामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि सामाजिक विकास व्हावा या हेतूने सदर कार्यक्रमाची महत्ता लक्षणीय आहे असे प्रतिपादन करत दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती होणारी निरसता ही चिंतेची बाब आहे हे देखील अधोरेखित केले.कार्यक्रमाचे संचलन प्रा.टी.यु.केंद्रे यांनी तर आभार डॉ. डी.जी. सावंत यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

close