जालना:-
जालन्याचे दिपक शिवाजी देवकर यांची मंत्रालय येथे महसूल सहायक म्हणून M. P. S.C. परिक्षेतून निवड झाल्याने वडार समाज संघाच्यावतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करून त्यांचा सन्मान पुर्वक सत्कार करण्यात आले.
या वेळी संभाजीनगर हून वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष जगननाथ अण्णा फुलांचे यांनी शुभेच्छा देतांनाच संघटनेची दशा आणि पुढील दिशा काय असावी संदर्भाने आपला मानस काय ते स्पष्ट केले. यावेळी जेष्ठ साहित्यिक.टी.एस.चव्हाण साहेब ,अशोक कुमाल सर, डॉ. अशोक बंडगर सर, मनोहर विटकर सर या सर्वांनी सविस्तर मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या छोटयाशा पण दर्जेदार कार्यक्रमाने वडार समाज संघाचे सुरूवात झाले आहे.यावेळी संघटनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

