shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कवरदडी येथे रवि सिड्स कंपनीचा पिक पाहाणी दौरा..!!

सेनगांव/विश्वनाथ देशमुख :

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील कवरदडी येथील प्रगतशिल शेतकरी तुळशीराम शिवराम कुंदर्गे यांच्या गव्हाच्या शेतात रवि सिड्स रिसार्च प्रा.लि.अलोट ता.जि.रतलाम (मध्यप्रदेश) या कंपनीचे व्यवस्थापक मृत्युंजय पस्तवार यांनी दि.२८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी आर.एस.आर.या वाणाच्या गव्हु पिकाची प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली.





यावेळी रवि सिड्स कंपनीचे व्यवस्थापक मृत्युंजय पस्तवार यांनी संशोधीत वाणाचे महत्व सांगत कंपनीचे संशोधित वाण सोयाबीन उन्नती,हरभरा मध्ये प्रकाश व गव्हामध्ये आर.एस.आर.१०१ या वाणाच्या वैशिष्ठ्याची माहीती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.यावेळी सेनगांव येथील कृषी केंद्र चालक नंंदलालजी मुंदडा मामा,स्वप्निल येस्के,प्रताप कोटकर,रामेश्वर वाळके,सारंग रोडगे,अरुण मुटकुळे,प्रभाकर आप्पा जिरवणकर,बालाजी कोटकर,म्हाळसापुर येथील बंडु गव्हाणे,पळशी येथील बाळासाहेब पवार,दाताडा येथील वैजनाथ आप्पा काळे आदीसह कवरदडी,कवठा,मकोडी,वरुड चक्रपाण,म्हाळसापुर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था कवरदडी येथील आत्माराम कुंदर्गे,माजी सरपंच दिलीपराव कुंदर्गे,विष्णु कुंदर्गे,रामेश्वर कुंदर्गे यांनी केले.

close