शिवसेना (शिंदे गट) पक्षाची सेनगांव तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी:
सेनगांव/विश्वनाथ देशमुख:
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीनचे अनुदान मयत शेतकऱ्यांच्या वारसांना व सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याच्या मागणीचे निवेदन सेनगांव तालुका कृषी अधिकारी वळकुंडे यांच्याकडे शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने दि.२७ फेब्रूवारी शुक्रवार रोजी देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारकडुन २०२३ च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन पिक उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे परंतु प्रत्येक गावातील काही मयत शेतकऱ्यांचे व सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अनुदान मंजुर झालेले असतांना देखील अद्याप वाटप करण्यात आले नाही.तरी मयत शेतकऱ्यांच्या वारसांना व सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वारसाच्या कागदपत्राची पुर्तता करुन घेऊन त्यांच्या वारसांना अनुदानाचा लाभ देऊन तात्काळ त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी या मागणीचे निवेदन सेनगांव तालुका कृषी अधिकाऱ्यांना शिवसेना तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी,माजी सभापती गजानन पोहकर,सापटगावचे सरपंच वसंतराव अवचार,स्वप्निल देशमुख,अमर तिडके,संतोष माहोरकर,विश्वनाथ चव्हाण,अनिल मगर आदी शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आले.


