shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावातील ग्रामपंचायतला कर भरा आणि शासनाच्या अनेक योजनेचा लाभ घ्या- कोकाटे..!

सेनगांवचे गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांचे वलाना नागरीकांना आवाहन..!

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील वलाना येथे सरपंच डॉ.देवानंद गोरे व ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी नामदेव गाढवे यांनी एक दिवस गावकऱ्यासोबत कार्यक्रमाचे आयोजन दि.२८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी वलाना येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित सेनगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांनी वलाना गावातील नागरीकांना अनेक योजने विषयी माहिती सांगुन संवाद साधत ग्रामपंचायतीला कर भरावा आणि शासनाच्या अनेक योजना आपल्या गावामध्ये राबवून घ्याव्यात असे आवाहन केले.


 यामध्ये नळपट्टी ,घरपट्टी,लाईट पट्टी असे कर भरून प्रत्येक नागरीकांनी आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन केले व शासनाच्या येणाऱ्या प्रत्येक योजना आपल्या गावामध्ये राबवाव्यात यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे.सेनगाव तालुक्यातील वलाना येथे पहिल्यांदाच एक दिवस गावकऱ्यांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी सेनगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव कोकाटे,गट शिक्षणाधिकारी पांडुरंग गिरी, सरपंच देवानंद गोरे,ग्राम विकास अधिकारी नामदेव गाढवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांनी योजने विषयी सविस्तर माहिती दिली तर शिक्षण अधिकारी पांडुरंग गिरी यांनी शिक्षणाविषयी माहिती दिली तर गावाच्या विकासासाठी सरपंच देवानंद गोरे यांनी माहिती दिली.या कार्यक्रमाला गावातील नागरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर बचत गटातील महिलांनी छोटे स्टॉल लावून उद्योग कसा करावा या संदर्भात माहिती दिली, आयुष्यमान भारत  नोंदणी करण्यात आली,आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
close