सेनगांव/विश्वनाथ देशमुख
श्री संत ज्ञानेश्वर महाराज गोकुळ गोशाळा व बजरंग दल गोरक्ष समिती मंडल अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते छत्रपती बाबुराव पोले रा.वडहिवरा.पो. भानखेडा.ता.सेनगांव.जिल्हा हिंगोली यांची दि.२३ फेब्रवारी रोजी महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांनी दिले असुन छत्रपती पोले यांच्या कामाची दखल घेऊन हि महत्वपूर्ण जबाबदारी छत्रपती पोले यांना देण्यात आली आहे.
छत्रपती पोले यांनी गोरक्षन व राज्यातील सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन कामं करत असुन महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामाजिक संस्थांना गो सेवेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या प्रोजेक्ट व योजना सर्व सामाजिक संस्थांना व गोशाळा ना देण्यात येणार आहे असे प्रतिपादन श्री छत्रपती पोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांनी दिले असून यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नितीन दांडगे,प्रदेश कार्याध्यक्ष राजकुमार मुंडे,प्रदेश सचिव अभिषेक पटारे पाटील,प्रदेश महासचिव प्रसाद निकम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

.jpg)
