shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाग्यश्री राजु पाटील यांना राज्यस्तरीय महिला गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान...

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवनात दि.१० मार्च सोमवार रोजी झालेल्या कार्यक्रमात भाग्यश्री राजु पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय महिला गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


भाग्यश्री राजु पाटील ह्या शेवगे बुद्रुक ता.पारोळा जि.जळगाव येथील रहीवाशी असुन त्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करुन पिडीत महिलांना न्याय देण्याचे काम करतात या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी भाग्यश्री राजु पाटील यांचा शाल,श्रीफळ सन्मान चिन्ह व पुरस्कार देऊन राज्यस्तरीय महिला गुण गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले व भाग्यश्री राजु पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली.हा पुरस्कार स्वप्निल फाउडेंशन पुणे यांच्या वतीने देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे सीआईडीचे आयजी संदीप राक्षे साहेब,मराठी चित्रपट अध्यक्ष मेघराज राजे भोसले,होम मिनिस्टर खेळांचा बादशाह बाळकृष्ण नेहरकर,शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया,चला हवा येऊ द्या च्या सिने अभिनेत्री शिवकांता पवार,शोभाताई बल्लाळ,पैंगबंर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close