सेनगांव/विश्वनाथ देशमुख :
सेनगांव येथील हाँटेल सुरुची मध्ये दि.१३ मार्च गुरुवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सेनगांव तालुका सदस्य नोंदणी नोंदणी आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी पक्ष प्रवेश सोहळा व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सेनगांव येथे झालेल्या सदस्य नोंदणी व आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेल प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी "गाव तिथं शाखा,घर तिथं राष्ट्रवादी" या विषयी मार्गदर्शन करीत पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे असे आवाहन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.यावेळी जिल्हाध्यक्ष बी.डी.बांगर,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सिताराम मामा जवळेकर,हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाशराव थोरात,विधानसभा अध्यक्ष बबनराव गलांडे,जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेड,सेनगांव तालुकाध्यक्ष विकास शिंदे,युवक प्रदेश सचिव सुजय देशमुख,हिंगोली तालुकाध्यक्ष रवि डोरले,कळमनुरी तालुकाध्यक्ष विजय गांवडे,तालुका उपाध्यक्ष अमजत फारुकी,सुरज वडकुते,देविदास गाडे,अतिक अत्तार,सचिन मस्के,बाळासाहेब मस्के,प्रकाश पाटील,नारायण पाटील,मोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.