शिर्डी प्रतिनिधी:
धुळे जिल्ह्यातील न्याहळोद येथील गावठाण मालकी जमीन असलेले गेल्या ७५ ते ८० वर्षापासून ग्रामपंचायत कर भरत असलेली जमीन दुसऱ्याच्या नावे सिटी सर्वे लागल्याने ग्रामपंचायत व सिटी सर्वे यांनी मूळ मालकाच्या नावे सिटीसर्वे लावण्यात यावी अशी मागणी येथील ७५ वर्षापासून ग्रामपंचायत कर भरत असलेल्या ग्रामस्थांनी केले आहे .
स्वातंत्र्य काळानंतर 1949 पासून ग्रामपंचायत कर भरत आलेले भोगवटादार ग्रामपंचायत ७५ वर्षांपासून दफ्तरी नोंद असलेली खरे हक्कदार घरपट्टी भरत असलेले हक्कदार यांना वगळून सिटीसर्वेने पूर्ण जागा दुसऱ्याच्या नावे कशी लावली असा आक्षेप भोगवटादार यांनी सिटीसर्वेवर घेतला आहे. ग्रामपंचायतीला विचारात न घेता परस्पर सिटीसर्वे लागलीच कशी आधी ग्रामपंचायत मग वीस वर्षानंतर सिटीसर्वे चा जन्म झाला परंतु सिटीसर्वे ने ग्रामपंचायतीला विचारात न घेता परस्पर सिटीसर्वे ने एकाच व्यक्तीच्या नावे लागले म्हणून सिटी सर्वे चे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
*गेल्या ७५वर्षांपूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचा पुरावा साक्ष*
न्याहाळोद येथील गावठाण जमिनीच्या सिटी सर्वे नंबर २२७ नोंदीत भाडेतत्त्वावर देण्याचे दाखवण्यात आले असून खाडाखोड करून संपूर्ण जमीन एकाच व्यक्तीच्या नावावर लावण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणात नवे पुरावे समोर येत आहेत. गेल्या ८० वर्षांपूर्वी त्या जागेवर जयराम सीताराम जिरे यांनी वडाचे झाड लावल्याचा पुरावा आजही प्रत्यक्ष अस्तित्वात असल्याचे साक्ष देत आहे. व ग्रामस्थ सांगत आहेत.
स्थानिकांच्या मते, संबंधित जागेवर आजही ते वडाचे झाड उभे असून, त्या झाडाशी कुटुंबाचा ऐतिहासिक संबंध आहे. त्या काळात जयराम सीताराम जिरे यांनी स्वतः झाड लावले होते, याबाबत गावातील ज्येष्ठ नागरिक साक्ष देण्यास तयार आहेत. त्यामुळे त्या जागेवर संबंधित कुटुंबाचा जुना ताबा व अस्तित्व सिद्ध होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ते ७५ वर्षांपासून घरपट्टी व इतर कर नियमित भरल्याच्या पावत्या उपलब्ध असताना आणि जागेवर ऐतिहासिक पुरावे असतानाही सिटी सर्वेमध्ये केवळ एकाच व्यक्तीचे नाव कसे काय लागले गेले? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रक्रियेत ग्रामपंचायतीची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. अनेक वर्षे कर स्वीकारूनही सिटी सर्वे नोंदीत योग्य माहिती का प्रतिबिंबित झाली नाही? चुकीच्या नोंदीकडे दुर्लक्ष का करण्यात आले? याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी सिटी सर्वे विभाग व ग्रामपंचायत या दोन्हींच्या कारभाराची सखोल चौकशी करून नोंदींची तपासणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मूळ हक्कधारकांच्या नावाने तात्काळ दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
गावठाण हक्काच्या या संवेदनशील प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
छायाचित्र: (न्याहळोद: येथील बस स्टँड जवळील सिटी सर्वे नंबर २२७ ग्रामपंचायत ७५ वर्षापासून भरत असलेले कर तेथील जुने झोपडे दिसून येत आहेत)

