shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा येथे हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती...

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे ज्याचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई ५५ लिटर पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु केली आहे मात्र अद्याप ही हिवरखेडा येथील जल जिवन मिशनचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे ग्रामस्थांना पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.





सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जल जिवनचे काम गेल्या दोन वर्षा पासून चालु आहे मात्र अद्याप ही हे काम गुत्तेदाराने पूर्ण केले नसल्याने गावातील ग्रामस्थांना पायपीट करीत शेतातील सरकारी विहिरी वरून पाणी आणावे लागत आहे. हिवरखेडा ग्रामपंचायतच्या जलजीवन अंतर्गत खोदलेल्या विहिरीला भरपूर पाणी साठा उपलब्ध आहे आणि नळ जोडनी देखील टाकण्यात आली आहे  पाण्याची टाकी देखील ऊभारण्यात आली आहे मात्र काही ठिकाणी पाईपलाईन टाकायची राहिली आहे.त्यामुळे गावात पाणी सुटत नाही संबंधित गुत्तेदाराला वेळोवेळी सांगुन देखील हे काम करण्यात येत नाही.प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन चालू करण्यात आले मात्र याचे काम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करीत पाणी आनावे लागत आहे.या आधी ग्रामपंचायत मार्फत गावातील विहीरीत पाणी सोडले जात होते मात्र गेल्या दोन दिवसा पासुन पाणी सुटत नाही त्यामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी सुटणे बंद झाले आहे ग्रामपंचायतच्या वतीने फुटलेली पाईपलाईन बरोबर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे


आमच्या गावातील जलजीवन मिशनचे काम गेल्या दोन वर्षापासून चालू आहे अद्याप ही काम अपूर्णच असल्यामुळे गावावर पाणीटंचाईची समस्या  आहे.धरण उशाला आणि कोरड घश्याला असी परिस्थिती सद्या निर्माण झाली आहे यापुर्वी देखील गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना शेतातील सरकारी विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागत होते आजही तीच परिस्थिती आहे.यामुळे जलजीवनचे काम गावात मंजूर झाले.यावर्षी तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल,असे वाटत होते.मात्र,जल जिवन मिशनचे हे काम अर्धवट झाल्याने पाण्याचा प्रश्न अद्याप ही कायम आहे.

शिवशंकर निरगुडे पत्रकार  रा.हिवरखेडा ता सेनगाव

close