shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य महास्वच्छता अभियान.

एरंडोलमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य महास्वच्छता अभियान.

४२३ श्रीसदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग; तब्बल २० टन २५० किलो कचऱ्याचे संकलन...

एरंडोल | दि. १ मार्च २०२६.

एरंडोल शहरात तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) यांच्या वतीने भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अवघ्या काही तासांत शहराचा कायापालट करत स्वच्छतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.

अभियानाची सुरुवात सकाळी रा.ति. काबरे विद्यालय येथून करण्यात आली. एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे कौतुक करत स्वच्छतेचा वारसा प्रत्येक नागरिकाने जपावा, असे आवाहन केले.

एरंडोलमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य महास्वच्छता अभियान.

सकाळी ७ ते ११ या वेळेत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रतिष्ठानचे तब्बल ४२३ श्रीसदस्य सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच उपनगरांमधून कचरा संकलित करण्यात आला.

या अभियानात सुमारे २ टन ओला कचरा व १८ टन २५० किलो सुका कचरा असे एकूण २० टन २५० किलो कचरा संकलित करण्यात आला. नगरपालिकेच्या १५ घंटागाड्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा कचरा सुरक्षितपणे डंपिंग ग्राऊंडवर पोहोचविण्यात आला.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून देश-विदेशात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे आदी समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. एरंडोलमध्ये पार पडलेल्या या महास्वच्छता अभियानातून ‘स्वच्छ एरंडोल, सुंदर एरंडोल’ हा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचला.

एरंडोलकरांनी श्रीसदस्यांच्या शिस्त, सेवाभाव आणि कार्यतत्परतेबद्दल विशेष आभार व्यक्त केले. शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करत या अभियानाची उत्साहात सांगता करण्यात आली.

close