shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोई समाज युवा फाऊंडेशन जळगाव तर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार.

एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक भाऊ मोरे व श्री नरेश भाऊ वाल्डे यांच्या सामाजिक कार्यासाठी सत्कार...

भोई समाज युवा फाऊंडेशन जळगाव तर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

जळगाव : भोई समाज युवा फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


या कार्यक्रमास जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोजदादा चौधरी, आमदार राजू मामा भोळे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे सुपुत्र तथा नगरसेवक विशालदादा भोळे, नगरसेवक किरण शिवदे, अतुलभाऊ बारी, सोनवणे, मुक्ताईनगर येथील नगरसेवक छोटूभाऊ भोई, तसेच भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष एस. ए. भोई,यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे एरंडोल येथील श्री अशोक मोरे व नरेश वाल्डे यांच्या सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सामाजिक एकजुटीचा संदेश देत समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सत्कार सोहळ्यामुळे समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

close