shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विज्ञानदिनानिमित्त एल जी. बनसुडे शाळेत भव्य विज्ञान प्रदर्शन

विज्ञानदिनानिमित्त एल जी. बनसुडे शाळेत भव्य विज्ञान प्रदर्शन
इंदापूर: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एल.जी बनसुडे इंग्लिश/ सेमी मीडियम स्कूल  अँड ज्युनिअर कॉलेज पळसदेव,विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स आणि प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पर्यावरण संरक्षण, सौरऊर्जा, जलसंवर्धन,फुग्याद्वारे हवेचा दाब दाखवणे,ज्वालामुखीचा प्रयोग,काचेच्या पेलातील पाण्याची घनता, चुंबकीय शक्ती,तसेच विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे या प्रदर्शनातून उत्कृष्ट दर्शन घडले.या विज्ञान प्रदर्शनाला पालक, शिक्षक तसेच शाळेचे संस्थापक हनुमंत बनसुडे , सचिव नितीन बनसुडे, प्रिन्सिपल वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे,उपमुख्याध्यापक सुवर्णा वाघमोडे,यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विज्ञान दिनानिमित्त आयोजक ऋषिकेश गंगणे,मनिषा कुदळे,हर्षदा काठवते तसेच सर्व विज्ञान शिक्षक यांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
close