राहुरी फॅक्टरी दि. १२ मार्च
राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट कामगारांचे धरणे आंदोलन प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांच्या यशस्वी मध्यस्तीने तूर्तास थांबविण्यात आले आहे.
प्रसंगी प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष चंद्रकांत कराळे, विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ शेकोकार सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ बाळासाहेब शिरस्कर सर , नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य गागरे सर, उपप्राचार्य ढोकणे सर, आयुर्वेदिक चे उपप्राचार्य डॉ बांगर सर तसेच आंदोलनात बसलेले सर्व कामगार उपस्थित होते.
डॉ बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने त्याचबरोबर विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे इन्स्पेक्शन होऊ घातल्याने संस्थेचे हित लक्षात घेऊन कामगारांनी निवडणूक होईपर्यंत धरणे आंदोलन थांबावे हि आप्पासाहेब ढूस यांची सूचना सर्व कामगारांनी मान्य करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचे मान्य केले त्याबद्दल प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी सर्व कामगार बांधवांचे आभार व्यक्त करून कारखान्याची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष या आंदोलनामध्ये सक्रिय होईल. व हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल असे सांगितले.. संस्थेच्या वतीने तीनही प्राचार्यांनी यामध्ये सहमती दर्शविल्याने त्यांनाही ढूस यांनी धन्यवाद दीले.
प्रसंगी तीनही प्राचार्यांच्या वतीने डॉ. शेकोकार सर यांनी निवडणूक आचारसंहितेच्या नंतर कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.