ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक नामदेवराव भोसले संचलित शेवराई सामाजीक संस्थेच्या सामाजाभिमुख विविध उपक्रमांमुळे हजारो गरीबांना न्याय मिळाला
अहील्यानगर / प्रतिनिधी:
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यिक नामदेवराव भोसले संचलित शेवराई सामाजिक संस्थेच्या वतीने परीवर्तनाची पाठशाळा पहाट या २०२५ व्या कॅमेर्याचे ओपनिंग कार्यक्रमाचे नुकताच आयोजन करण्यात आले होते.
अहील्यानगर,पाथर्डी व अहील्यानगर (ग्रामीण) येथील आदिवासी कष्ट करुन आपली उपजिवीका भागवणारे परंतू कलंकित जिवनातून जिवन गुजारन करणारे गरीब आदिवासी पारधी कुटुंबातील श्रम करणारे श्रमीक रहिवासी नागरीक हे अहील्यानगर पोलीस स्टेशन अतंर्गत रहिवासी असुन सदर या दोन घरी "एक कॅमेरा पोलीसांच्या मदतीसाठी व एक कॅमेरा स्वरंक्षणासाठी" या संकल्पनेतून एक एक गरीब कुटूंब गुन्हेगारीच्या कलंकित जिवनातून मुक्त करण्याच्या उद्दिष्टेने. त्यांचे मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात एक पाऊल पुढे मदतीचा या अनुषंगाने शेवराई सामाजीक संस्थेच्या वतीने समाजसेवक व साहित्यिक, नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यांमध्ये काम चालू आहे. त्यांच्या या कार्यक्रमाळे हजारो गरीब कुटुंबांना न्याय मिळत आहे, त्यामुळे नामदेव भोसले यांच्या कामांचेच नव्हेतर कार्यांचे राज्यातून कौतुक केले जात आहे, त्यांच्या या सामाजाभिमुख उपक्रमात सर्वजण सहभागी होत आहेत हे कौतुकास्पद आहे असेअहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राजेश ओला यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितलें.
कोपरगांव, सुपा, कर्जत, पाथर्डी या तालुक्यातील आदिवासी पारधी वस्तीवर कॅमेर्याचे ओपनिंग कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक राकेश ओला व लोकमतचे संपादक सुधीर लंके यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात येवून ओपनिंग कार्यक्रम पार पडला, सदर कार्यक्रम कामंरगाव (पारधी वस्ती) भोसले वस्ती येथे आयोजित केला होता,सदर कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला, लोकमतचे संपादक सुधीर लंके, ज्येष्ट आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव भोसले, सामाजिक कार्यकर्ते पाठक सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीती,पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे,कामरगांव चे सरपंच संदिप ढवळे, सामाजिक कार्यकर्ते.बाबा भोसले, कामरगावचे माजी सरपंच, रवींद्र भोसले, लताबाई भोसले, किशोर चव्हाण आणी आदिवासी पारधी बांधव,ग्रामस्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.
-----------------------------------
*निरपराध लोकांवर शंकेच्या मनोवृत्तीत गुन्हा दाखल करु नये,आत्ता त्यांच्या मदतीसाठी सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे, त्यामुळे श्रमिक, कष्टकरी कुटूंब सुखाची झोप घेत आहेत - आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111