अकोले ( प्रतिनिधी ) :-
चिमुकल्या विध्यार्थ्यांचा अप्रतिम नृत्य अविष्कार कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी, संपूर्ण शाळेसह गावात केलेली नयनमनोहर रोषणाई, केक कापून, गावजेवणाने, माजी विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
कळस बुद्रुक (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी वार्षिक स्नेहसंमेलन व शाळेचा १२० वा वर्धापन दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी अगस्ती देवस्थान चे विश्वस्त हभप विष्णू महाराज वाकचौरे हे होते. यावेळी जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम समिती चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, अगस्ती कारखाना संचालक सीताराम वाकचौरे, संगमनेर कारखाना संचालक संभाजी वाकचौरे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नामदेव निसाळ, हभप गणेश महाराज वाकचौरे, हभप अरुण महाराज शिर्के, पत्रकार अमोल शिर्के, स्वाभिमानी सचिव संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश रेवगडे, शिक्षणाधिकारी श्री अभयकुमार वाव्हळ, शालेय पोषण आहार अधीक्षक अरविंद कुमावत, विस्ताराधिकारी माधव हासे, गोवर्धन ठूबे, केंद्रप्रमुख शकील बागवान उपस्थिती होते.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनेने झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यानी केलेल्या शिवाजी महाराज नाटिकेने अंगावर रोमांच उभे राहिले, अफजल खानाच्या वधाने हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी मैदान दुमदुमले. दुसरी च्या विद्यार्थ्यानी सादर केलेले सावळा कुंभार नाटकाने प्रेक्षकांचे डोळे पानावले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित गाणे ने सर्वांचे मन जिंकले, कीर्तन व दिंडी सोहळयाने प्रत्यक्षात पंढरी अवतरली, सिंधुताई सपकाळ यांचे एकपात्री अभिनयाने मन जिंकले, इंदूरिकर कॉमेडी व कोंबडा कापता है या गिताने मनमुराद हसवले, लावणी नृत्याने तमाशात बसल्याचा आनंद उपभोगला. फ्युजन डान्स, इ. कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भर भरून दाद दिली.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक मुख्याध्यापक तान्हाजी वाजे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णू वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन संगीता दिघे,योगेश थोरात यांनी केले. माधवी गोरे, हर्षल सोनवणे, संपत भोर, स्वप्ना गुरव, सुवर्णा जाधव, पुष्पा सूर्यवंशी, वृषाली बर्वे, कैलास भागवत, श्री यासिर सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक ढगे, ज्ञानेश्वर वाकचौरे, इम्रान सय्यद, मनीषा वाकचौरे, सुवर्णा ढगे, गीतांजली वाकचौरे यांनी सहकार्य केले.