शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार १२ मार्च २०२५
पळसखेडे येथे स्वामी समर्थ मठात स्वामिनी गोमातेचा पंचक्रिया विधी संपन्न..!!
संगमनेर : गायीला आपण गोमाता मानतो तिच्यात तेहतीस कोटी देव पाहतो, देशी गायींचे संगोपण व संवर्धन करावे या उदात्त हेतूने श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ महाराज मठ पळसखेडे येथे स्वामिनी गोमातेचा पंचक्रिया विधी संपन्न केला.
स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे यांनी देशी गायी ने संगोपन मठात केले असून त्यातील स्वामिनी गायी चे निधन झाले. तिचा अंत्यविधी मठात भावपुर्ण वातावरणात व शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आला.
गोमातेचे नाव स्वामिनी होतं अगदी तीन वर्षापासून ती मठामध्ये राहत होती. अनेक भाविकांना तिचा लळा लागला होता. अनेक भाविक तिला चारापाणी करून तिची सेवा करित होते. या स्वामिनी गोमातेला देवाज्ञा झाली मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे हे हजारो भाविक भक्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचा एक सुंदर काम तर करतच आहेत पण त्यांनी एक उत्तम उदाहरण आपल्याला दिलेले आहे.
पंचकर्म विधी प्रसंगी ह भ पल्लवीताई वाकचौरे यांनी प्रवचन रुपी सेवा दिली. प्रवचना तुन गोमाता ही आपली आईच असते आणि आईच जास्त आपण विधी करत असतो तसेच गोमातेचा देखील आपण विधी करावा गोमातेची इकडे तिकडे टाकून हेडसाळ करण्यापेक्षा शास्त्र पद्धतीने आपण गोमातेची देखील विधी पार पाडावा गोमाता मध्ये ३३ कोटी देवांचा वास्तव्य असतं आणि गोमाता आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये असावी मुक्या जीवांना आपण जपलं तर तेही आपल्याला जीव लावत असतात.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी समस्त ग्रामस्थ स्वामी सेवेकरी सर्वजण उपस्थित होते. अन्नदान पिंडदान पंचक्रियेच्या दिवशी करण्यात आले मठाधिपती प्रदीप दादांनी एक सुंदर कार्य केलेलंआहे. या उपक्रमा बाबत त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600