निबंध, रांगोळी व भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेत्यांचा झाला गौरव
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक विशेष शिबिराचे आयोजन मौजे कासारी या.केज येथे दि.6 मार्च ते 12 मार्च 2025 या कालावधीत करण्यात आले होते.
विशेष शिबिराचा समारोप दि. 12 मार्च 2025 रोजी उत्साहात झाला. समारोपाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल किर्दंत हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी युवकांच्या जबाबदारीवर भर देत असे मत व्यक्त केले की, "आजचा युवा हा उद्याचा भारत आहे आणि त्याने डिजिटल साक्षर असणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी डिजिटल साधनांचा योग्य वापर करून समाजहित साधावे.व्यासपीठावर क्रांतिवीर आत्माराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय, कासारी या शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. चोले व्हि.डी. व डॉ.छत्रभुज इंगळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ . इंगळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांनी यातून समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
या शिबिरात स्वयंसेवकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम यामध्ये ग्रामस्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, डिजिटल साक्षरता कार्यशाळा, स्वच्छता जनजागृती रॅली आणि व्यक्तिमत्व विकास सत्रे यांचा समावेश होता.
स्वच्छता अभियानात चिंचपुर मारुती देवस्थानचा परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून भित्तीपत्रके,निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.यादव जे. बी. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. क्षीरसागर पी.बी. यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रसिद्धी विभागाचे डॉ.बी.जे.हिरवे यांनी केले.
या विशेष शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.जे.बी.यादव, प्रा. डॉ. बोबडे ए. आर. डॉ.शाम सरसरे , डॉ.टी.एस.बिडवे , डॉ.सुधीर आगळे, डॉ.प्रमोद काळम,युवराज डोईफोडे यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी शिबिर यशस्वी केले.