शिवसेनेच्या वतीने तहसिलदारा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी...
सेनगाव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुर्णा नदीच्या पात्रातुन वाळु माफीयाकडुन रात्री बेरात्री अवैध वाळु उपसा करुन वाहतुक केल्या जाते ती तात्काळ बंद करुन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी गोरगरीबांना स्वस्तात द्या अन्यथा ढोल बजाव आदोंलन करण्यात येईल या मागणीचे निवेदन दि.१२ मार्च बुधवार रोजी शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांच्या मार्फत हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुर्णा नदीच्या पात्रातुन वाळु तस्कराकडुन प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन रात्री बेरात्री अवैध वाळु उपसा करुन वाहतुक केल्या जात असुन ती वाळु बेभाव विक्री केली जात आहे.याबाबत वेळोवेळी निवेदन सादरत करत तसेच तोंडी प्रत्यक्षात वाळु वाहतुकीचे फोटो देखील सादर केलेत परंतु याची प्रशासनाच्या वतीने कोणतीच दखल घेतली नाही परीणामी वाळु तस्कर सुसाट सुटले आहेत व शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडवत आहेत.प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत गोरगरीबांना घरकुलाचे अनुदान वितरीत होत आहे परंतु वाळु अभावी सदरील बांधकाम रखडले असुन गोरगरीबांना घरकुलाचे घराचे स्वप्न हे स्वप्नच राहाते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वाळुमाफीयांची महागडी वाळु घेणे त्यांना परवडत नाही.तरी नदी पात्रातुन वाळु माफीयाकडुन रात्री बेरात्री अवैध वाळु उपसा करुन होणारी वाहतुक तात्काळ बंद करुन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी गोरगरीबांना स्वस्तात वाळु उपलब्ध करुन द्या अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.यावेळी सेनगाव तालुकाप्रमुख संतोष देवकर,शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख,तालुका संघटक प्रविण महाजन,युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे-पाटील,नगरसेवक वैभव देशमुख,प्रशांत देशमुख,विलास सुतार,करण देशमुख,अमर देशमुख,भैया जाधव,गणेश रंजवे,बबलु देशमुख आदीसह उपस्थित होते.