रमजान मुबारक २०२५ - रोजा नं.११
कोई सुनता नहीं दुआ के सीवा !
कोई सुनता नहीं खुदा के सीवा !!
अबू हु्रेरा रजि. सांगतात की, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व.यांनी सांगितलं की, अल्लाह रब्बूल इज्जत म्हणतात, की, अद - इंद - जननीं - बी - व - अन - मआहूं - इजा - द नीं " अर्थात - मी आपल्या अनुयायी (बंदे) साठी असा आहे की, जसा तो माझ्या बद्दल विचार करतोय किंवा आठवण करतो आणि जेव्हा जेव्हा तो मला हाक (पुकारतो) मी त्या त्या वेळी त्याच्याबरोबरच असतो.(सहीहं बुखारी),
पुन्हा एकदा प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, तुमच्या रब (अल्लाह - परमेश्वर) ने सांगितले की, " मला तुमची दुआ मागत चला आणि तुमचे म्हणणे (दुआ- विनंती) मी जरूर कबूल (मान्य स्विकारील) करील. (मसनद ए हादिस, तिरमिझी,अबू दाऊद, इब्न माझा).
इस्लाम मध्ये दुआ चे फार महत्व आहेत.
दुआ - हा अरबी शब्द आहे, त्याचा शब्दशा अर्थ एखाद्याला बोलावणं होतो, तसे अरबी भाषेत एका शब्दाचे तीस तीस अर्थ होतात, परंतु आपल्याला याचा अर्थ अल्लाहकडे कळकळीची याचना करणं- विनंती करणं - मागणी करणं - मागणी मागणं- आपण आपली याचिका अल्लाह कडे सादर करणं, अल्लाह कडे कृपेची - दयेची याचना करणं, अल्लाहकडे आपल्या प्रत्येक गरजेच्या गोष्टी मागणं, आपल्या प्रत्येक समस्यांचे ग्राहणे मांडणं, आपण आपले ग्रहाणे विश्व च्या मालकाकडे अल्लाह - (ईश्वराकडे) सर्व शक्तीमान अशा अल्लाहकडे मांडत असतो.
तसे बघितलं तर दुआं म्हणजेच इस्लाममध्ये उपासनेचाच प्रकार आहे, प्रत्येक मुस्लिम श्रद्धांवंताच्या दुआ चे खूप महत्व आहेत, प्रत्येक गरजेचे दुवा करणे म्हणजेच एक उपासना कारणेचहश होय.
प्रेषित मुहम्मद यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, दुआ करणं, तुम्हीं केलेल्या सर्व उपासनाचे सार आहे,
व तुम्ही कधी दुआ नाही केली तर अल्लाहला फार राग येतो म्हणून थोडी जरी अल्लाहची उपासना केली तरी अल्लाहकडून काही बक्षीसे घेणं हे अल्लाहला खुश करण्यासारखं असतं. नाहीतर ते आपल्याला अहंकार झाल्यासारखं होतं. अल्लाहला अहंकारी मनुष्य पसंत नाहीत. गर्वाचे घरे खाली म्हणतात तेच, प्रत्येक श्रद्धावंत मुसलमानांना प्रत्येक आणीबाणीच्या व संकटाच्या काळात जवळच्या मित्रासारखा हो, अगदी जवळच्या मित्रा सारखा अल्लाहच वाटतो. अगदी मित्रासारखंच, अल्लाहजवळ आरे कारे च्या भाषेतच दुवा केली जाते, जसा काय अल्लाह आपल्या समोरच आपल्या शेजारीच बसलेला आहे, एक विश्वासू मित्रा सारखा मित्र,
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, अल्लाह जवळ येवढ्या भरवश्यावर, भरवश्याने दुवा करा की तो संपूर्ण एकूण घेऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा, मुराद, मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारच आहे, येवढा भरोसा ठेवून दुवा करा (हादिस तिर्मिजी).
पवित्र कुरआनमध्ये अल्लाह म्हणतात की हे पैगंबर स्व.... जेव्हा माझे भक्त (सेवक, श्रद्धांवान) माझ्या बाबतीत तुम्हाला विचारतील तर तुम्ही माझ्यावतीने त्यांना सांगा की,तो (अल्लाह) तर तुमच्या अगदीच निकट (जवळ) च आहे, आणि कोणी हाक दिली तर हाक देणाऱ्याच्या हाकेला मी प्रतिसाद देत असतो.
जे अनुचित मागण्या सोडून सर्व योग्य मागण्या पूर्ण करतोय (पारा (खंड ०२,सुरह (अद्याय ०२) सुरह बकराह आ. नं. १८६).
जेव्हा जेव्हा तुम्ही संकटाच्या विळख्यामध्ये असतात तेव्हा तेव्हा तुम्ही अल्लाहकडे याचना करतात, अर्थात आपण प्रत्येक्षात संपूर्ण सृष्टीच्या मालकासमोर, विश्वाच्या निर्माणकर्त्या समोर आपलं म्हणणं रूपी अर्ज सादर करत असतो, म्हणून आपलं सर्व अहंकार सोडून दुवा जरूर कराव्यात, घडी घडी दुवा करावी म्हणजे आपल्या हृदयात एक कोमलता निर्माण होते, अहंकार नष्ट होतं, मी पणाचं पतन होतं, हृदय हलकं होतं, एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो व कोणत्याही गरजेसाठी सरळ सरळ अल्लाहच्या दरबारात हात पुढे करून हात पसरवून दुवा याचना करून ती पूर्ण करायची म्हणूनच म्हणतात ना कीं,
दुआ मोमीन का हत्यार है !हार बार मांगा करो तो क्या हासील !
दुआ वही है जो दिल से कभी निकलती है !
(क्रमशा:)
मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांचा ही फायदा नक्कीच होईल, प्रतिक्रिया आवश्य कळवा )
लेखक - डॉक्टर सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर
जि.अ.नगर मोबा: 9271640014