वडाळा महादेव ( प्रतिनिधी ):
या तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रमाच्या वतीने प्रथमच आयोजित श्रीरामपूर , रेणुका दरबार सोनई, शिंगणापूर, मढी धामणगाव ते मोहटादेवी पदयात्रा नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
आश्रमाचे संस्थापक मौनयोगी सद्गुरू रेवणनाथ महाराज यांच्या प्रेरणेने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमातर्फे दरवर्षी माहुरगडाला दिंडी जाते त्याला २४ वर्षांची परंपरा आहे तथापि कमी कालावधीत व जवळचे अंतर पूर्ण करत अहिल्यानगर जिल्ह्यातील शक्तिपीठ मोहटादेवी पदयात्रा आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत आश्रमाचे विद्यमान विश्वस्त आदिनाथ जोशी. साधक राजेंद्र देसाई भानुदास महाराज व बापूसाहेब पिटेकर यांचा सहभाग होता.
चार दिवसात तब्बल १०५ किलोमीटरचे अंतर पार करून रविवारी पायी दिंडी मोहटादेवी गडावर पोहोचली या ठिकाणी श्री जगदंबा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रेचे मंगल औक्षण व पूजनाने स्वागत करण्यात आले तसेच मौन योगी रेवणनाथ महाराज व भगवती रेणुका देवी यांच्या चरणकमल पादुकांचे पूजन करण्यात आले संबळाच्या निनादात पदयात्रा गडावर पोहोचली देवीच्या गाभाऱ्यात पोहोचण्याचे सौभाग्य पदयात्रींना लाभले श्री जगदंबा देवस्थान तर्फे पदयात्रींचा यथायोग्य मोहटादेवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. पदयात्रा कालावधीमध्ये सर्वश्री बबन मिसळ , ऊंडे पाटील परिवार ,उल्हास आवटी, कोठावळे बंधू ,प्रकाश गुरु जोशी, घनश्याम केंगे, प्रल्हाद आंबीलवादे राजू घाटोळे,अंबादास राऊत परिवार ,भाऊसाहेब शिंदे, राजू देवा जोशी ,बाबासाहेब कराळे पाटील ,नंदू देवा जोशी परिवार, प्रदिप राऊत, सारंग मंत्री यांनी पदयात्रेचे फटाक्यांची आतिषबाजी करून मंगल औक्षण करून स्वागत केले पादुका पूजन महाआरती व प्रसादाचे आयोजन केले.
परतीच्या प्रवासानंतर रेणुकादेवी आश्रमात मातोश्री नलीनी जोशी,सौ अदिती जोशी, सौ व श्री विकास पोहेकर परिवार यांनी स्वागत केले.अभिषेक पूजनाने पदयात्रेची सांगता झाली.
मोहटादेवी पदयात्रा परंपरा कायम ठेवली जाईल असे संयोजन समितीचे वतीने सांगण्यात आले आहे.

