*D-2 झोन बुद्धिबळ स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकचे यश*
इंदापूर :इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) यांच्या वतीने आयोजित D-2 झोन अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धा भारती विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक, पुणे येथे सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथील कॉम्प्युटर विभागाच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रनर-अप (द्वितीय क्रमांक) पटकावला. या यशात
ओम मिठारे, आकाश मिसाळ, प्रतीक जाधव, आयुष सोनवणे व श्रवण कांतोडे या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स इन्चार्ज प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ, तसेच स्पोर्ट्स समन्वयक श्री. ज्ञानदेव धुमाळ व प्रा. प्रियंका सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की,“शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातील सहभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बुद्धिबळासारख्या खेळामुळे निर्णयक्षमता, एकाग्रता व बौद्धिक कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असून भविष्यातही अशीच कामगिरी करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे.”
महाविद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.

