shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरच्या आश्रमशाळेत जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.*

*इंदापूरच्या आश्रमशाळेत जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.*
*इंदापूर*: (*दि.१२*) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीचे आयोजन संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी आश्रमशाळेतील मुलींनी जिजाऊंची वेशभूषा परिधान करून त्यांचा त्याग, कर्तृत्व आणि संस्कारांचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांनी तथागत गौतम बुद्ध, जिजाऊ माँसाहेब,संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमात जिजाऊंच्या जीवनकार्यावर आधारित विद्यार्थ्यांकडून भाषणे, अभिवाचन, पोवाडे व गीतं यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून जिजाऊंच्या आदर्श विचारांची प्रेरणा मिळाल्याचे प्राचार्या अनिता साळवे यांनी नमूद केले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, अधीक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यश कांबळे,संचित कांबळे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. कु.दीक्षा कडवळे हिने आभार मानले.
close