वाळकी प्रतिनिधी : अहिल्यानगर येथे दिं ११ जानेवारी रोजी अखिल लोहार समाज विकास संघ आणि लोहार युथ फाऊंडेशन यांचे वतीने राज्यस्तरीय वधु वर मेळावा व गुणवंतांचा सत्कार आयोजित कार्यक्रमांमध्ये आर्किटेक्ट सुरज बाळासाहेब इघे यांना त्यांच्या कार्याबद्दल राज्य स्तरीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले सदर सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.जे.एन टी ओबीसींचे राज्याचे जॉईट डायरेक्टर संतोष हराळे साहेब, मुंबई विद्यापीठाचे भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण कोठे,अखिल लोहार समाज विकास संघ राज्याध्यक्ष संदीप दादा थोरात, लोहार युथ फाउंडेशनचे राज्याध्यक्ष किशोरभाऊ सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक हर्षल आगळे, महसूल अधिकारी राजेंद्र लाड, पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, मा. नगराध्यक्ष राहुरी नगरपरिषद दशरथराव पोपळघट, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे, सोमनाथ हरेल, प्राध्यापक प्रभाकर लाड यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच राज्यांमधून आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थित हा राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार देण्यात आला.
जुलै २०२४ रोजी सुरज इघे यांनी चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, थायलंड, श्रीलंका, इराण, आणि सिंगापूर अशा पंधरा देशांमध्ये स्पर्धक आणि तज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. निप्पॉन पेंट इंडियाचे प्रमुख मार्क टायटस यांचे शुभ हस्ते सुवर्ण करंडक आणि रोख ५०,००० रुपयांचे पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.

