वाळकी प्रतिनिधी : लोहार समाज बांधव व भगिनींसाठी हा आनंद द्विगुणित करणारा एक क्षण आहे, असे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रा हर्षल आगळे यांनी सांगितले.
अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्याननगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या वतीने नुकताच शहरातील लक्ष्मी नारायणमंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल स्वागताध्यक्ष प्रा. आगळे यांनी समाधान व्यक्त केले.मेळाव्याची विशेष उपलब्धी म्हणजे या मेळाव्यात राज्यभरातून सुमारे ३१० उपवर वधूंची नोंदणी झाली तर सुमारे ७५ उपवर वधू यांनी आपला परिचय करून देत आपल्या भावी जोडीदाराबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. या मेळाव्यात रेशीमगाठ या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. लोहार समाज बांधव व भगिनींसाठी हा आनंद द्विगुणित करणारा एक क्षण आहे.
समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याला मिळालेला प्रतिसाद ही समाजाकरिता गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे.
आजच्या गतिमान व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअर,नोकरी व व्यवसायात व्यस्त आहे.त्यामुळे पूर्वी प्रमाणे समाजात सर्वस्तरावर सखोल परिचय होणे शक्य नाही. आजच्या काळात वधू-वर परिचय मेळावा घेणे ही आगामी काळाची गरज आहे. अशा मेळाव्यामुळे राज्यातील तसेच सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त विवाह इच्छुक युवक-युवतींची माहिती एकत्रितपणे व एकाच मंचावर,एकाच ठिकाणी प्रत्यक्ष मिळत आहे. त्यामुळे समाज बांधवांचा वेळ,पैसा व श्रम वाचून कठीण कार्य होण्यास मदत होईल.
या मेळाव्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांचा मी आभारी आहे, असे स्वागताध्यक्ष प्रा.आगळे म्हणाले.
तसेच या वधू वर परिचय मेळाव्यात साप्ताहिक विश्वकर्मा समाचार चे लोकार्पण करण्यात आले. हे साप्ताहिक विश्वकर्मा समाचार समाजाचे मुखपत्र असून याद्वारे समाजातील समस्या अडचणी मान्यता येणार आहेत. समाजाच्या अडचणी समस्या मारण्यासाठी हे हक्काचे साप्ताहिक असणार आहे. सुरुवात प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंती पासून सुरुवात होत आहे.समाज बांधवांनी आप आपल्या समस्या व जाहिराती hpagale@gmail.com या मेलवर पाठवाव्यात असे प्रा.हर्षल आगळे यांनी सांगितले.

