shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांचा पुढाकार आवश्यक - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील* निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न.

*समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांचा पुढाकार आवश्यक - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

 निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर :   इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे  कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर तसेच बावडा येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय तसेच इंदापूर महाविद्यालयाचा कनिष्ठ विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबीर दि. 09/01/2026 ते 15/01/2026 या कालावधीत नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर ता. इंदापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे . या विशेष शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य “मी नाही, आम्ही” याचा अर्थ स्पष्ट केला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी स्वयंप्रेरणेने पुढे येणे आवश्यक असून, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त आणि सेवाभाव निर्माण करणारी प्रभावी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
     या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के उपस्थित होते. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के आपल्या मनोगतात म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाशी नाते जोडणारे असावे. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. समाजातील समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची वृत्ती निर्माण होते. हेच खरे शिक्षण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
   संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी, संस्थेचे संचालक विलासबापू वाघमोडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   सातारा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विजय कुंभार, इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, उपप्राचार्य दत्तात्रय गोळे, तसेच बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लहू वावरे,भोडणी गावच्या सरपंच राधिका प्रशांत गोसावी यावेळी उपस्थित होत्या.
   या विशेष शिबिराच्या कालावधीत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पाणी बचत जनजागृती, आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक जनजागरण, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामभेट, सर्वेक्षण, प्रभातफेरी, श्रमदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येणार आहे.
      कार्यक्रमाधिकारी प्रा.उत्तम माने यांनी शिबिराचा उद्देश, नियोजन आणि आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. 
     विद्यार्थ्यांनीही समाजसेवेची शपथ घेऊन जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
      राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम माने, प्रा. महम्मद मुलाणी, प्रा. प्रशांत साठे, प्रा.अमोल मगर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले. 
   आभार डॉ. लहू वावरे यांनी मानले.
    प्रा.स्वाती राऊत यांनी महाविद्यालय व राष्ट्रगीत सादर केले.
close