shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मकर संक्रांतीच्या पर्वावर शिरडीत भक्तीचा महासागर; नवनिर्वाचित नगराध्यक्षा व CEO यांच्या हस्ते 'परिक्रमा ध्वजारोहण' उत्साहात संपन्न


श्री साईनाथ महाराज की जय’च्या गजरात शिरडी दुमदुमली; हजारो भाविकांच्या साक्षीने 'शिरडी परिक्रमा' ध्वजाचे दिमाखदार अनावरण

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी नगरीत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर 'शिर्डी परिक्रमा ध्वजारोहण सोहळा - २०२६' अत्यंत मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. टाळ-मृदंगाचा गजर आणि 'श्री साईनाथ महाराज की जय'च्या जयघोषात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आज (दि. १४) सकाळी या सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली. सर्वप्रथम साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन बाबांना सोहळ्याचे विधिवत आमंत्रण देण्यात आले व ध्वजाचा स्पर्श श्रींच्या समाधीला करून आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर निघालेली भव्य ध्वज मिरवणूक गुरुस्थान, गणेश मंदिर, शनी व महादेव मंदिर, श्री दत्त मंदिर आणि नंदादीपमार्गे मार्गस्थ झाली. साईभक्तीने ओसंडून वाहणाऱ्या या मिरवणुकीने द्वारकामाई आणि चावडी येथे दर्शन घेतले. त्यानंतर गावातील ग्रामदैवत मंदिरांचे दर्शन घेत मिरवणूक खंडोबा मंदिरात पोहोचली. संपूर्ण मार्गावर साईभक्तांनी काढलेल्या रांगोळ्या आणि फुलांच्या वर्षावाने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
खंडोबा मंदिरातून ही सवाद्य मिरवणूक मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी, अर्थात मंदिर गेट नं. ४ जवळ दाखल झाली. येथे ध्वजाचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर आणि नगराध्यक्षा सौ. थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच उपस्थितांनी एकच जयघोष केला. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि देश-विदेशातील साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close