shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार हेमंत ओगले यांचेकडून देवळालीकरांना संक्रांतीची भेट..!


📌 जिल्हा नियोजन मधून देवळाली साठी तब्बल नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर.!
📌 प्रभाग क्रमांक दोन, चार आणि सात.. हाय मॅक्स आणि पथ दिव्यांनी उजळून निघणार..!
📌 प्रहारचे आप्पासाहेब ढूस यांचेकडून आ. हेमंत ओगले यांचे आभार..!

श्रीरामपूर दि. १४ जानेवारी 
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या मागणी नुसार जिल्हा नियोजन समिती मधून देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन, चार आणि जुना सहा म्हणजे आत्ताचा सात (प्रसादनगर) आदी प्रभागात हायमॅक्स आणि पथ दिवे लावून तेथील नागरिकांचे अंधकारमय झालेले जीवन प्रकाशमय करण्यासाठी तब्बल नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


 अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी या मंजुरीचे आदेश देवळाली प्रवरा नगरपरिषदेला दिल्याने आज  संक्रांतीच्या मुहूर्तावर त्या मंजुरी आदेशाचे प्रतिसह प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व कराळे, देवळाली प्रवरा संपर्क प्रमुख गणेश भालके, प्रतीक फुलपगार आदींनी आमदार हेमंत ओगले यांची श्रीरामपूर येथे भेट घेऊन देवळाली प्रवरा शहरवासीयांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
close