वडापुरीत सोमवारी भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन.
इंदापूर:वडापुरी गावातील वयोवृद्ध नागरिकांच्या अडचणी वरती मात करण्यासाठी वडापुरी (ता. इंदापूर) येथे शरद कामटे मित्र परिवार यांच्या वतीने समोवार दि.27आक्टो. 2025 रोजी श्री नाथ मंदिर येथे मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास जार भेट म्हणून देण्यात येणार आहे.तसेच याच दिवशी वयोवृद्ध नागरिकांसाठी कोल्हापूरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ हिंदुराव शंकराव गुरव यांच्या उपस्थितीत डोळ्यांचे उपचार, सांधेदुखी, शुगर, आम्लपित्त, कंबरदुखी, गुडघेदुखी, नशा मुक्ती, वजन कमी करणे वाढवणे यावर उपचार होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शरद कामटे व जालिंदर रेडेकर यांनी दिली. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

