३८ वर्षांनंतर ‘नूतन विद्यालय’चे विद्यार्थी पुन्हा एकत्र — भावनिक गेट-टुगेदरला उत्स्फूर्त प्रतिसाद!
राहाता प्रतिनिधी : (तुषार महाजन)
नूतन विद्यालय शिर्डी येथील १९८६-८७ च्या बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. गेल्या तब्बल ३८ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुन्हा एकत्र आल्याने आनंदाश्रूंनी सर्वांचे डोळे भरून आले.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांना पुष्पवर्षाव करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आदरणीय गुरुजनांच्या पायावर लोटांगण घालून आशीर्वाद घेतले. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक के. सी. खैरनार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बी. जे. रायते, नितीन जैन, आर. डी. वाघ, भदाणे सर, एस. एम. वाघ, जी. एम. पाटील, आरिफ पठाण, माळी सर आदींची उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी थोर नेत्यांना अभिवादन करून दिवंगत विद्यार्थी व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ज्या विद्यार्थिनींच्या पतींचे निधन झाले आहे, अशा महिलांना साडी-चोळी देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा परिचय देत जुने दिवस आठवले आणि एकमेकांना आलिंगन देऊन आपुलकीचा भाव प्रकट केला.
कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी विद्यार्थ्यांनी विविध समित्या स्थापन केल्या होत्या —
भोजन व्यवस्था समिती :
भारत आबामाळी, हिंमतराव बोरसे, मनोहर जिरे, कांतीलाल, रामकृष्ण उखा जिरे, प्रमोद रोकडे, हिरालाल दगा, संदिप रोकडे, सुदर्शन पाटिल, शशीकांत. यांनी केली.
सुरक्षा समिती :
मधूकर वाघ, संजय महाजन, नाना वाडिले, सुनिल वाकडे, सुनिल जिरे, मच्छीद्र फुलपगारे, नितीन गुजर, आला वंजारी, सुदाम जिरे, फुला कोळी.
शांतता समिती :
बापू वायरमन, धनराज चौधरी, गोरख रायते, सजीव माळी, संजय जाधव, विनोद पाटिल कौठळ, नाना पाटिल, हरलाल भाऊसाहेब, छोटू जिरे, नरेंद्र जिरे.
नाश्ता व्यवस्था समिती :
राजू पाटील, शिवाजी खैरनार, दत्तू पाटिल, नंदराज महाजन, कैलास महाजन, सुधाकर जिरे, रविंद्र माळी, भारत धोबी, रामकृष्ण भोगे, रत्नाकर पवार.
शिक्षक व पाहुणे व्यवस्था समिती :
अमृत वाघ, राजेश माळी, ईश्वर रोकडे, धनराज महाजन, युवराज चौधरी, विनोद पोतदार, शांतीलाल डॉक्टर, सुभाष निकम, अनंतकुमार पंचभाई, पुनमचंद पाटील.
या भावनिक सोहळ्यात शोभा महाजन, प्रमिला वाघ, शोभा घरटे, कल्पना वाघ, निर्मला वाघ, निर्मला भदाणे, अलका कोठावदे, वैशाली माळी, किरण बच्छाव, छाया शेटे, ललिता पाटील, भिकू कोळी आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संदीप रोकडे यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण स्नेहसंमेलन सुरळीत आणि शिस्तबद्धरीत्या पार पडले.
या सर्व समित्यांनी जबाबदारीने आपापले काम पार पाडल्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाला. शेवटी सर्व मित्रांनी “जय श्रीराम” चा जयघोष करत एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले.

