shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाचे उद्योजक रमेश शिंदे यांना “रायगड किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इटाळकर पुरस्कार”

📰 शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा

पुणे (प्रतिनिधी) – तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन – २०२५ हा भव्य सोहळा अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर, येरवडा येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या संमेलनात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.


याच कार्यक्रमात वडार समाजाचे प्रगतिशील उद्योजक, समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व मा. श्री रमेश वामन शिंदे (पुणे ) व सौ.शिंदे  यांच्यासह प्रतिष्ठित “रायगड किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इटाळकर पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

हा सन्मान त्यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, समाजाच्या उन्नतीसाठी केलेले योगदान, तसेच होतकरू तरुणांना रोजगार आणि प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.

सन्मान स्वीकारताना रमेश शिंदे म्हणाले –

हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून, तो माझी समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढवतो. वडार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि एकतेसाठी मी सातत्याने कार्यरत राहीन.”

रमेश शिंदे यांनी व्यवसाय क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवत समाजातील अनेक तरुणांना उद्योजकतेकडे वळवले आहे. त्यांनी सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे.

या सन्मानानंतर वडार समाजातील मान्यवर, साहित्यप्रेमी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी रमेश शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

🕉️ — शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
(सामाजिक बांधिलकीसाठी कटिबद्ध माध्यम)

०००००


close