एरंडोल: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलच्या एरंडोल तालुकाप्रमुखपदी राजेंद्र रामदास चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी आणि आमदार अनिल दादा पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
राजेंद्र चौधरी यांना नियुक्तीपत्र जळगाव जिल्हाध्यक्ष संजयदादा पवार, किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील सर आणि जिल्हा कार्याध्यक्ष योगेशभाऊ देसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्र चौधरी यांनी नियुक्तीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्यासाठी नवे उपक्रम राबवणे व पक्षाच्या धोरणांनुसार काम करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन.”
या नियुक्तीनंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून चौधरी यांच्या नेतृत्वाखाली किसान सेलची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
उपस्थित डॉक्टर सेलचे जिल्हाप्रमुख महेश दादा पवार सर्व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.