शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिला गेला भावनिक निरोप; शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे मनोगत यामुळे प्रसंग झाला अविस्मरणीय.
एरंडोल :- शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ, एरंडोल येथे 23 मे 2025 रोजी औषधनिर्माण पदवी व पदवीका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनांच्या लाटेत पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री व उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती आणि धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थी प्रतिनिधींच्या मनोगतातून महाविद्यालयातील आठवणी जाग्या झाल्या तर प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी यशासाठी आत्मविश्वास आणि कृतज्ञतेचा संदेश दिला. संपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते अधिक दृढ झाले.