श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मातृपितृ सेवा हा भारतीय संस्कृतीचा आदर्श असून संगमनेर येथील मनिषाताई रसाळ यांनी संसारबंधनात न गुंतवून घेता द.सा. रसाळगुरुजी आपल्या वडिलांची सेवा स्वीकारली, त्यांची पितृसेवा श्रावणबाळासारखीच आदर्श सांगणारी असल्याचे मत श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानच्या सचिव सौ. आरती गणेशानंद उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे मनिषाताई रसाळ यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मनिषाताई रसाळ यांच्या अनेक वर्षापासूनचा पितृसेवा धर्म आणि रसाळ गुरुजींची स्वाध्यायी विचाधारा, लेखन, वाचन संस्कृतीची जपवणूक कशी केली, त्याबद्दल माहिती देऊन मनिषाताई रसाळ ह्या खऱ्या अर्थाने वंशदिवा होऊन पितृसेवा करीत असल्याची माहिती दिली. आरती उपाध्ये यांनी द.सा. रसाळगुरुजी आणि मनिषाताई यांचे पिताकन्या यांचे सेवानाते विशद केले. याप्रसंगी द सा. रसाळगुरुजींनी आपली लेक मनिषाताई यांचे सेवाभावी व्यक्तिमत्त्व आणि आदर्श गृहदक्ष कन्येचे प्रसंग सांगितले. मनिषाताई रसाळ यांनी आपल्या सत्काराबद्दल भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. दिलीप सोनवणे, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनीही मनिषाताई रसाळचे कौतुक केले. सौ.मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 956117411