श्रीरामपूर / प्रतिनिधी:
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा विभाजन करू असे विधानसभा सभापती प्रा. ना.राम शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र शासनाने गेली ४३ - ४४ वर्षापासून रखडलेल्या जिल्हा विभाजन सामाजिक प्रश्ना ऐवजी अहिल्यानगर जिल्हा नामांतर केले. योगायोगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळी ३०० व्या जयंती निमित्ताने राज्याचे विशेष मंत्री मंडळ बैठकीचे चौंडी येथे आयोजन केल्याने जिल्हा विभाजन चर्चेला उधाण आले आहे.
या बैठकीत श्री रामाचे नावाने असलेला आणि निकषाचे आधारे सर्वात कमी खर्च येणारा एकमेव श्रीरामपूर जिल्हा सर्वानुमते जाहिर करावा अन्यथा जिल्हाभर घंटनाद आंदोलन करू असा इशारा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदनद्वारे दिला आहे. यावेळी कार्याध्यक्ष भागचंद औताडे मार्गदर्शक नागेशभाई सावंत, निलेश शेडगे जिल्हाध्यक्ष भारत स्वतंत्र पक्ष शेतकरी संघटना, राजेंद्र गोरे सचिव म.स्टे.ई. काँ. अ. युवराज जगताप तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब चेडे, शरद डोळसे, ताराचंद शेख अभिजित बोर्डे,इमरान शेख इत्यादी उपस्थित होते.
निवेदनत राजेंद्र लांडगे म्हणाले, अनेक वर्षापासूनचा जिल्हा विभाजन श्रेय वादाचा तिढा संपुष्टात येणं सर्वांचे हितावह राहिल. क्षेत्रफळाने गोवा राज्या पेक्षा पाच आणि दिल्ली राज्यापेक्षा अकरा पट मोठा अहिल्यानगर जिल्हा आहे. यामुळे आपत्कालीन काळात प्रशासनावर नेहमीच ताणतणाव येऊन धावपळ होते. बहुतांशी कार्यालये निकषाच्या आधारे श्रीरामपूरात कार्यान्वित आहेत. त्याचबरोबर श्रीरामाच्या नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी संघर्ष समितीने अनेकदा जन आंदोलने केली आहे. आजी - माजी लोकप्रतिनिधीना अनेकदा निवेदने दिली आहे. मात्र जिल्हा विभाजन होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
तसेच राजकारण विरहित श्रीरामपूर जिल्हा झाल्यास गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त होऊ शकेल. नवनवीन उद्योगधंदे सुरू होतील. त्यातून रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्यानंतर सर्व सामान्यांच्या क्रय शक्तीत देखील वाढ होईल. केंद्र- राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविता येतील. पर्यायाने त्याचा लाभ थेट सर्व सामान्यांना होईल. त्याच बरोबर ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांकरिता देखील विकासात्मक योजना राबविण्यास मदत होईल.
योगायोगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज प्रा.नामदार राम शिंदे यांनी त्री शताब्दी जयंती निमित्ताने चौंडी सारख्या ग्रामीण भागात मंत्री मंडळाची विशेष बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत जिल्हा विभाजन सारखे अनेक ऐतिहासिक निर्णय होतील अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
राज्याला धाडसी आणि कर्तुत्वनिष्ठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार लाभले आहे. लवकरच फडणवीस - शिंदे - पवार सरकारने प्रलंबित जिल्हा विभाजन प्रश्न एकदाचा मार्गी लावावा, शासन निकष आधारे प्रायोगिक तत्वावर सामाजिक भावनेतून श्रीरामपूर जिल्हा निश्चितच करतील अशी सर्व जिल्हा प्रेमींची अपेक्षा आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने श्रीरामपूर जिल्हा न झाल्यास जिल्हाभर प्रत्येक हनुमान मंदिरात श्रीराम तारक मंत्र नामजप करत घंटानाद आंदोलन करण्यावर ठाम राहू असा इशाराही शेवटी राजेंद्र लांडगे यांनी दिला आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111