*हरनिया,हायडोसिल,अमबिलिकल हर्निया, अपेनडिस्क, इतर आजारांवरील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मोर्शी -महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे 30रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले.
शिबिराचे उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आयोजित शिबिरात तब्बल 30 सामान्य शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचे उपस्तित,, सर्जन ,डॉ प्रविण बिजवे ,डॉ राहुल खऩना, व भुलतज्ञ डॉ. जगदीश काळभोर , डॉ. अश्विनी वंजारी यांचे प्रत्येक्ष सहभागणे संपन्न झाले हे शिबिर , जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौदंळे, डॉ संदीप हेडाऊ यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील, वरूड व मोर्शी चे वैद्यकीय समन्वयक डॉ घनश्याम मानकर , श्रीमती.मिनाक्षी वगारे, श्रीमती .रेशमा बहुरूपी,भागश्री नागले, अकिंत नेवारे ,स्वाती पाटील, ज्ञानेश्वर टाकले,,सागर झटाले, प्रवीण कापडे, आकाश जवंजाळ ,शोभा इंगळे,शिला राऊत,आचल तायवाडे ,नौशाद शहा, महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना मधील वशीम शेख ,प्रकाश पांडे,सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन व सविस्तरपणे माहिती देऊन करण्यात आली.