shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण दिनानिमित्त कोकळगाव आरोग्य उपकेंद्रात वृक्षारोपण


 कोकळगाव आयुष्यमान आरोग्य मंदीर उपकेंद्र या ठिकाणी 5 जुन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कोकळगाव व आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निसर्गसंपदेचे जतन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. आजचा पर्यावरण दिन साजरा करत असताना आपण सर्वांनी एका विचाराने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कटीबद्ध होवूयात. 

             पर्यावरणाच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. विशेषतः येणाऱ्या पिढीवर तसे संस्कार रुजवून एक समृद्ध पिढी यातून निर्माण होईल. पर्यावरण समृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करूयात.
      यावेळी पत्रकार श्री.द्रोणाचार्य कोळी साहेब, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत रूमणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री.धनंजय धवण, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के.जाधव, आशा स्वयंसेविका श्रीमती.सी.आर.सूर्यवंशी, सेविका श्रीमती.कमलबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी मुन्ना पठाण उपस्थित होते.
close