अहिल्यानगर प्रतिनिधी:-
हिवरे बाजार (ता. नगर) येथे ग्रामीण विकासाचा आदर्श ठरलेले पद्मश्री पोपटराव पवार यांना नुकतीच रमेश जेठे सर, रामचंद्र मंजूळे व विष्णू पवार यांनी सन्मानपूर्वक भेट दिली. या भेटीदरम्यान पद्मश्री पोपटराव पवार यांनी राज्यात आदर्श पध्दतीने केलेल्या कामाचे विशेष कौतुक करून विविध सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकासाच्या विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या विशेष आदरातिथ्याने पाहुण्यांचे मन जिंकले. त्यांच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता, लोकसहभाग आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन या बाबींची माहिती त्यांनी दिली. भेटीत जलसंधारण, शाश्वत शेती, ग्रामविकासातील नवकल्पना तसेच तरुणांमध्ये सामाजिक जाणीव जागवण्यावर भर देण्यात आला.
या भेटीदरम्यान निर्माण झालेला सकारात्मक संवाद हा भविष्यातील विविध उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. विशेषतः ग्रामीण भागात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामूहिक विचार आणि कृती याचे महत्व अधोरेखित झाले.
पोपटराव पवार यांचे आदर्श कार्य आणि त्यांनी दिलेला मनःपूर्वक सन्मान ही सर्वांच्या स्मरणात राहील अशी प्रेरणादायी भेट ठरली.